त्वचेला वेगवेगळ्या प्रकारचे विकार होऊ शकतात जसे गर्मास उत्सर्जित करणारे बारीक फोड, संसर्ग, अंतर्गत कारणांमुळे वाढीवर होणारे परिणाम इत्यादी.
तसेच त्वचेचे काही विकार खालील प्रमाणे आहेत.
- जखम (लेशन)
- वर उठणारी मोठी जखम (पप्युल)
- फोड (पस्तुल) - पप्युल प्रमणेच पण पू तयार होतो.
- सेबोर्र्हेया- त्वचेवर तैलस्त्राव करणारी ग्रंथी संपुष्टात आल्यामुळे हा विकार उद्भवतो.
- पांढरट चट्टे (व्हाईट हेड्स)- त्वचेवर तेलाचे प्रमाण वाढल्याने, छिद्रांचे तोंड उघडे न राहिल्यामुळे हा विकार उद्भवतो.
- काळे चट्टे (ब्लॅक हेड्स) - हा विकार छिद्रांचे तोंड उघडेच राहिल्यामुळे बाह्य प्रदुषणाशी थेट संबंध आल्यामुळे होतो. ऑक्सिकरणाने काळ्या रंगात परीवर्तन होते.
- पुटकूळ्या (ऍस्ने) - हा एक सर्वसामान्य विकार आहे. विशेषतः तारुण्यात पाऊल ठेवणारी व्यक्ती या विकारा अढळते. लैंगिक गुणसुत्रांमधे वाढ झाल्याने हा विकार उद्भवू शकतो. त्वचेवरील छिद्रे मोठी असतात. याच कारणाने त्वचेवर काळेचट्टे किंवा पुटकूळ्या येतात. तसेच हे नंतर वाढत जाऊन पस्तुल या विकारात रुपांतर होऊ शकते. पुरुष व स्त्रिया दोघांनाही हा विकार होऊ शकतो. यावर दुर्लक्ष होता कामा नये. निदान होईल अशी व व्यवसायिक उपचार घेणे अपरीहार्य असते.